Sameer Amunekar
जिम सुरू करण्यापूर्वी तुमचे ध्येय नक्की करा. तुम्हाला वजन कमी करायचे आहे, स्नायू वाढवायचे आहेत (Muscle Building) की फक्त फिट राहायचे आहे? स्पष्ट ध्येय असल्यास वर्कआउटवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
रिकाम्या पोटी कधीही व्यायाम करू नका. वर्कआउटच्या ३०-४५ मिनिटे आधी केळे, ओट्स किंवा ड्राय फ्रूट्स यांसारखे हलके कार्बोहायड्रेट्स घ्या. यामुळे शरीराला व्यायामासाठी आवश्यक ऊर्जा मिळते.
थेट वजन उचलण्यापूर्वी शरीराला तयार करणे गरजेचे आहे. १०-१५ मिनिटे वॉर्म-अप केल्याने स्नायू लवचिक होतात आणि दुखापतीचा (Injury) धोका कमी होतो. यामुळे व्यायामाचा निकालही चांगला मिळतो.
व्यायामासाठी 'कॉटन' ऐवजी 'ड्राय-फिट' कपड्यांची निवड करा. तसेच, वर्कआउटच्या प्रकारानुसार योग्य शूज वापरा. योग्य फिटिंग आणि आरामदायी गिअरमुळे हालचाली सुलभ होतात.
व्यायाम करताना घामावाटे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे व्यायामाच्या दरम्यान थोडे थोडे पाणी पित राहा. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असल्यास थकवा लवकर जाणवत नाही.
सुरुवातीला जास्त वजन उचलण्याच्या नादात चुकीच्या पद्धतीने व्यायाम करू नका. व्यायामाचे तंत्र (Technique/Form) योग्य असणे महत्त्वाचे आहे. गरज पडल्यास ट्रेनरचा सल्ला नक्की घ्या.
स्नायूंची वाढ व्यायामाच्या वेळी नाही, तर विश्रांतीच्या वेळी होते. त्यामुळे दररोज ७-८ तासांची झोप घ्या आणि आठवड्यातून किमान एक दिवस शरीराला पूर्ण विश्रांती द्या.