Sameer Amunekar
पावसाळ्यात जिमला जाणं किंवा घराबाहेर चालायला जाणं खरंच कठीण होतं. अशा वेळी घरच्या घरी करता येतील असे सोपे आणि प्रभावी व्यायाम प्रकार तुमच्या तब्येतीसाठी फायदेशीर ठरू शकतात.
स्क्वॅट्स हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे जो मुख्यतः पाय, नितंब (hips), आणि कोअर मसल्स मजबूत करण्यासाठी केला जातो. तो घरच्या घरी सहज करता येतो,
पुश-अप्स हा एक संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे, जो विशेषतः छाती, खांदे, हाताचे स्नायू, आणि कोअर मसल्स मजबूत करण्यासाठी केला जातो. कोणत्याही उपकरणांशिवाय, घरच्या घरी सहज करता येणारा हा एक प्रभावी व्यायाम आहे.
प्लँक हा एक अत्यंत प्रभावी बॉडीवेट व्यायाम आहे जो विशेषतः कोअर (core muscles) म्हणजे पोट, कमरेचा भाग आणि पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी केला जातो.
जम्पिंग जॅक्स हा एक अत्यंत सोपा आणि मजेशीर कार्डिओ व्यायाम आहे जो घरात सहज करता येतो. शरीरात तत्काळ उष्णता निर्माण करतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
स्टेअर क्लायंबिंग म्हणजे घरातील किंवा बिल्डिंगमधील जिन्यांच्या पायर्यांवर चढ-उतरणं. हा एक सोपा पण प्रभावी व्यायाम आहे जो पायांच्या स्नायूंना बळकट करतो आणि कार्डिओ फिटनेस वाढवतो.