Sameer Amunekar
दुधातील लॅक्टिक ऍसिड त्वचा स्वच्छ करते, तर हळद चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा देते. १ चमचा हळदीत २ चमचे कच्चं दूध मिसळून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावा.
लिंबाचा व्हिटॅमिन C त्वचेला उजळवतो, तर मध त्वचा मऊ आणि ग्लो देतो. 1 टीस्पून लिंबू + 1 टीस्पून मध मिसळून 10-12 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. आठवड्यात 3 वेळा वापरा.
हे स्किनचे डेड सेल्स काढून त्वचा ताजी आणि स्वच्छ करते. 1 चमचा बेसन + 1 चमचा दही मिसळून 15 मिनिटांनी धुवा.
काकडी स्किनला कुलिंग देऊन पिगमेंट कमी करण्यात मदत करते. काकडीचा रस कापसाने चेहऱ्यावर फिरवा. 15 मिनिटांनी धुवा.
हे नेहमी स्किन फ्रेश आणि हायड्रेट ठेवतं. झोपण्यापूर्वी कापसाने चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा.
हे स्किनला ग्लो देतं, सन टॅन कमी करतं आणि चेहरा मऊ ठेवतं. ताजं आलोव्हेरा जेल चेहऱ्यावर मसाज करा आणि रात्री तसेच राहू द्या.
हे सोपं वाटतं पण सर्वात महत्त्वाचं आहे. डिहायड्रेशनमुळे त्वचा निस्तेज दिसते. दिवसातून ८-१० ग्लास पाणी + 7 तास झोप आवश्यक.