Sameer Amunekar
कोवलम बीच हा केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे. हा बीच खासकरून त्याच्या सूर्यास्ताच्या अप्रतिम नजाऱ्यासाठी ओळखला जातो.
राधानगर बीच अंदमान आणि निकोबारमधील एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. हा बीच आशियातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक मानला जातो.
कर्नाटकमधील हा बीच कपल्ससाठी एक शांत, निसर्गरम्य आणि कमी गर्दी असलेला बीच आहे. जर तुम्हाला रोमँटिक वातावरण हवं असेल, तर हा बीच उत्तम पर्याय आहे.
गोव्यातील पाळोले बीच कपल्ससाठी सर्वोत्तम आणि सर्वात निसर्गरम्य बीचपैकी एक आहे. जर तुम्हाला शांतता, निळंशार पाणी आणि रोमँटिक व्हायब हवे असतील, तर हा बीच एकदम परफेक्ट आहे!
मरिना बीच हा भारतातील सर्वात लांब आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा समुद्रकिनारा आहे. चेन्नईमधील हा बीच आपल्या सौंदर्य, सूर्यास्ताचे नजारे आणि रोमँटिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील अलिबाग बीच हा एक सुंदर, रोमँटिक आणि शांत किनारा आहे. कपल्ससाठी हे एक उत्तम विकेंड गेटवे आहे, जिथे तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर रिलॅक्स करू शकता. वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करू शकता.