गोमंतक ऑनलाईन टीम
वर्कआउटच्या ३०–६० मिनिटे आधी हलका आणि पौष्टिक आहार घेतल्याने व्यायामासाठी ऊर्जा मिळण्यास मदत होते.
जिमला जाण्यापूर्वी पुरेसं पाणी प्या. शरीर हायड्रेटेड ठेवल्याने वर्कआउटदरम्यान थकवा कमी होण्यास मदत होते.
थेट हेवी एक्सरसाइज सुरू करण्याऐवजी ५–१० मिनिटे हलका वॉर्म-अप करा. त्यामुळे शरीर व्यायामासाठी तयार होतं.
अपुरी झोप असल्यास शरीराला रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे नियमित आणि पुरेशी झोप महत्त्वाची आहे.
क्षमता लक्षात घेऊन वजन निवडा. योग्य फॉर्म आणि तंत्राला जास्त महत्त्व द्या.
कोणता व्यायाम, किती सेट आणि किती वेळ करायचा हे ठरवल्याने जिममध्ये अनावश्यक वेळ वाया जाणार नाही.
काही दिवसांत परिणाम मिळण्याची अपेक्षा न ठेवता नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यावर लक्ष केंद्रित करा.
केसांची वाढ थांबलीय आणि सतत केस गळतायेत? सकाळी उठल्यावर 'हे' नक्की करा