Gym Tips: व्यायाम करुनही बॉडी बनत नाहीये? परफेक्ट मसल ग्रोथचा 'हा' जादूई फॉर्म्युला

Manish Jadhav

स्नायू जीममध्ये नाही, तर विश्रांती घेताना बनतात!

जीममध्ये वजन उचलताना स्नायूंच्या तंतूंना सूक्ष्म तडे जातात (Micro-tears). जेव्हा तुम्ही जीममधून बाहेर पडता, योग्य आहार घेता आणि आराम करता, तेव्हाच हे स्नायू रिपेअर होऊन पूर्वीपेक्षा जास्त मोठे आणि मजबूत बनतात.

Gym Tips | Dainik Gomantak

'ओव्हरट्रेनिंग'चे मोठे धोके!

आठवड्याचे सातही दिवस जीम केल्याने शरीराला रिपेअर होण्यासाठी वेळच मिळत नाही. याला 'ओव्हरट्रेनिंग सिंड्रोम' म्हणतात. यामुळे स्नायूंचा विकास पूर्णपणे थांबतो, सतत थकवा जाणवतो आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

Gym Tips | Dainik Gomantak

'कॉर्टिसॉल' हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते!

सततच्या वर्कआउटमुळे आणि पुरेशा विश्रांतीअभावी शरीरात कॉर्टिसॉल म्हणजेच स्ट्रेस हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते. कॉर्टिसॉल वाढल्यास ते मसल्सचा पेशींना नष्ट करण्यास सुरुवात करते, ज्यामुळे मसल्स लॉस होतो.

Gym Tips | Dainik Gomantak

दुखापतींचा धोका वाढतो!

विश्रांती न घेता थकलेल्या स्नायूंवर पुन्हा ताण दिल्यास जॉइंट्स, लिगामेंट्स आणि स्नायूंवर प्रचंड ताण येतो. यामुळे स्लिप डिस्क, शोल्डर इंज्युरी किंवा स्नायू फाटण्याचा धोका 10 पटीने वाढतो.

Gym Tips | Dainik Gomantak

चेतासंस्था थकते

जड वजन उचलल्याने केवळ तुमचे स्नायूच नाही, तर तुमची चेतासंस्था देखील थकते. CNS ला पूर्ववत होण्यासाठी विश्रांतीची गरज असते, अन्यथा पुढच्या वर्कआउटमध्ये ताकद अजिबात निघत नाही.

Gym Tips | Dainik Gomantak

रेस्ट डे नक्की कसा असावा?

रेस्ट डे म्हणजे दिवसभर पलंगावर पडून राहणे नव्हे. रेस्ट डेच्या दिवशी हलका वॉक, स्ट्रेचिंग किंवा योगासने करु शकता, ज्याला 'Active Recovery' म्हणतात. यामुळे स्नायूंमधील रक्ताभिसरण सुधारून रिकव्हरीचा वेग वाढतो.

Gym Tips | Dainik Gomantak

आठवड्यातून किती रेस्ट डे आवश्यक

सामान्य फिटनेस प्रेमी किंवा नवशिक्यांसाठी आठवड्यातून 2 दिवस (उदा. बुधवार आणि रविवार) रेस्ट डे ठेवणे आदर्श मानले जाते. योग्य वर्कआउट + उत्तम डाएट + 7-8 तासांची गाढ झोप = परफेक्ट मसल ग्रोथ!

Gym Tips | Dainik Gomantak

Gym Tips: वर्कआउटनंतर अंग दुखणे चांगले की वाईट? जाणून घ्या

आणखी बघा