Gym Tips: फळं खा, ताकद वाढवा! जिमला जाणाऱ्यांसाठी सुपर डाएट टिप्स

Sameer Amunekar

केळी

वर्कआउटच्या आधी किंवा नंतर केळं खाणं फायदेशीर ठरतं. यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं, जे स्नायूंना ऊर्जा देतं आणि थकवा दूर करतं.

Gym Tips | Dainik Gomantak

सफरचंद

सफरचंद कमी कॅलरी, भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेलं. नैसर्गिक साखरेमुळे मिळतो नैसर्गिक एनर्जी बूस्ट – आरोग्यासाठी उत्तम आणि चवीलाही खमंग.

Gym Tips | Dainik Gomantak

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी म्हणजे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C चा खजिनाच. या चविष्ट फळांमुळे स्नायूंचं पुनरुत्पादन जलद होतं आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

Gym Tips | Dainik Gomantak

पपई

पपई फळ पचनक्रिया सुरळीत ठेवतं. तसंच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे स्नायू दुखण्यातही दिलासा मिळतो.

Gym Tips | Dainik Gomantak

संत्रं

संत्रं शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि व्हिटॅमिन C मिळवण्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. वर्कआउटनंतरचा थकवा दूर करून फ्रेशनेस देतं.

Gym Tips | Dainik Gomantak

अननस

अननसामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी घटक स्नायू दुखणे आणि थकवा कमी करण्यात मदत करतात.

Gym Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा