Gwalior Fort: मुघल काळातील भयानक 'शाही तुरुंग'! जिथे कैद्यांना दिली जायची मरणयातना; ग्वाल्हेरच्या अंधारकोठडीची थरारक कहाणी

Manish Jadhav

ग्वाल्हेर किल्ला

राजपूत राजे सूरज सेन यांनी स्थापन केलेल्या ग्वाल्हेर किल्ल्याला त्याच्या अभेद्यतेमुळे 'जिब्राल्टर ऑफ इंडिया' आणि बाबरने 'हिंदुस्तानातील किल्ल्यांच्या गळ्यातील मोती' म्हटले होते.

Gwalior Fort | Dainik Gomantak

'मान मंदिर पॅलेस'

कछवाह, तोमर, मुघल, मराठा (सिंधिया) आणि ब्रिटीश अशा अनेक सत्ता अनुभवणाऱ्या या किल्ल्यात राजा मानसिंग तोमर यांनी 'मान मंदिर पॅलेस' बांधला होता.

Gwalior Fort | Dainik Gomantak

'शाही तुरुंग'

मुघल काळात राजकीय कैद्यांसाठी 'शाही तुरुंग' असलेल्या या किल्ल्यात शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांना जहांगीरने कैदेत ठेवले होते.

Gwalior Fort | Dainik Gomantak

सिंधिया घराण्याची राजधानी

18व्या शतकात मराठा साम्राज्याचा भाग बनलेला हा किल्ला महादजी शिंदेंनी ताब्यात घेतला आणि तो सिंधिया घराण्याची राजधानी बनला.

Gwalior Fort | Dainik Gomantak

ब्रिटीशांना मोठे आव्हान

1857च्या स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी तात्या टोपेंच्या मदतीने या किल्ल्यावर ताबा मिळवून ब्रिटीशांना मोठे आव्हान दिले होते.

Gwalior Fort | Dainik Gomantak

राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण

याच किल्ल्याच्या परिसरात ब्रिटीश सैन्याशी शौर्याने लढताना राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आले, ज्यामुळे या किल्ल्याला स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक महत्त्व आहे.

Gwalior Fort | Dainik Gomantak

स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना

आजही हा किल्ला भव्य मान मंदिर, गुजरी महाल आणि ऐतिहासिक मराठा-राजपूत स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.

Gwalior Fort | Dainik Gomantak

Chittorgarh Fort: विशाल माशाचा आकार, डोंगरावरील 'जलदुर्ग' अन् 7 दरवाजांचे चक्रव्यूह; चित्तोडगडच्या मातीचा अद्भूत वारसा

आणखी बघा