Manish Jadhav
तब्बल 700 एकरात पसरलेला चित्तोडगड हा भारतातील सर्वात मोठा किल्ला मेवाडच्या डोंगरावर एखाद्या अवाढव्य माशासारखा (Fish Shape) दिसतो.
अल्लाउद्दीन खिलजीच्या कुदृष्टीपासून स्वतःचा सन्मान वाचवण्यासाठी राणी पद्मिनी यांनी हजारो राजपूत स्त्रियांसह धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली होती.
गडाच्या आत एकेकाळी 84 नैसर्गिक तलाव आणि विहिरी होत्या, ज्या तब्बल 50000 सैनिकांची 4 वर्षांची पाण्याची गरज भागवू शकत होत्या.
राणा कुंभा यांनी सुलतानांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची साक्ष देणारा हा स्तंभ मेवाडच्या अजोड स्थापत्यकलेचा नमुना आहे.
आपल्या मुलाचा बळी देऊन राजपुत्राचे प्राण वाचवणारी 'पन्ना दाई' आणि कृष्णभक्तीत तल्लीन झालेली 'मीराबाई' याच मातीशी जोडलेली होती.
खिलजी, बहादूर शाह आणि अकबर अशा तीन बलाढ्य शत्रूंविरुद्ध लढताना या किल्ल्याने राजपूत वीरांचे अंगावर काटा आणणारे बलिदान अनुभवले.
शत्रूला गडाच्या आत जाणे अशक्य व्हावे यासाठी पाडन पोळ ते राम पोळ असे 7 महाकाय आणि अभेद्य दरवाजे बांधण्यात आले आहेत.