Konkan Summer Vacation: हनीमून असो वा उन्हाळी सफर! कपलसाठी 'गुहागर' निसर्गाचं स्वर्गीय देणं; इथ अनुभवा कोकणाच्या सौंदर्याचा मखमली स्पर्श

Manish Jadhav

विस्तीर्ण आणि शुभ्र वाळूचा किनारा

गुहागरचा समुद्रकिनारा हा कोकणातील सर्वात लांब आणि विस्तीर्ण किनाऱ्यांपैकी एक आहे. येथील शुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी पर्यटकांना पहिल्याच नजरेत भुरळ घालते.

Guhagar Beach | Dainik Gomantak

नारळ-सुपारीच्या बागांची हिरवळ

किनाऱ्यालगत असलेल्या नारळ आणि सुपारीच्या (माड-पोफळीच्या) घनदाट बागांमुळे हा परिसर नेहमीच थंड आणि हिरवागार राहतो. हे दृश्य डोळ्यांना कमालीची शांतता देते.

Guhagar Beach | Dainik Gomantak

व्याडेश्वर मंदिराचे धार्मिक महत्त्व

किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर भगवान शिवाचे प्राचीन 'व्याडेश्वर मंदिर' आहे. हे मंदिर गुहागरचे ग्रामदैवत असून समुद्राच्या लाटांच्या आवाजात या मंदिरात दर्शन घेणे एक वेगळाच अनुभव असतो.

Guhagar Beach | Dainik Gomantak

अप्रतिम सूर्योदय आणि सूर्यास्त

गुहागरच्या विस्तीर्ण क्षितिजावर होणारा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. आकाशातील रंगांची उधळण आणि समुद्राचे निळे पाणी यांचे समीकरण फोटोग्राफीसाठी उत्तम आहे.

Guhagar Beach | Dainik Gomantak

वॉटर स्पोर्ट्स आणि साहसी खेळ

शांतता हवी असणाऱ्यांसोबतच साहसी पर्यटकांचीही येथे काळजी घेतली जाते. येथे बनाना राईड, जेट स्की आणि पॅरासेलिंगसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.

Guhagar Beach | Dainik Gomantak

घरगुती आणि चविष्ट कोकणी जेवण

गुहागरमध्ये राहण्यासाठी अनेक 'होमस्टे' उपलब्ध आहेत. येथे अस्सल कोकणी पद्धतीचे मासे, उकडीचे मोदक आणि सोलकढी यांसारख्या पदार्थांवर पर्यटक ताव मारु शकतात.

Guhagar Beach | Dainik Gomantak

प्रदूषणमुक्त आणि शांत वातावरण

इतर व्यावसायिक किनाऱ्यांच्या तुलनेत गुहागरमध्ये गर्दी कमी आणि शांतता जास्त असते. प्रदूषणमुक्त हवा आणि स्वच्छ किनारा यामुळे कौटुंबिक सहलीसाठी हे एक सुरक्षित ठिकाण आहे.

Guhagar Beach | Dainik Gomantak

जवळची प्रेक्षणीय ठिकाणे

गुहागरला गेल्यावर तुम्ही जवळच असलेले हेदवीचे दशभुजा गणपती मंदिर, वेळणेश्वरचा समुद्रकिनारा आणि दाभोळची खाडी या ठिकाणांनाही सहज भेट देऊ शकता.

Guhagar Beach | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा