Sameer Amunekar
वेलची हे एक सुगंधी मसाला पीक आहे, जे अन्नात चव आणि सुगंध वाढवते. ही झाडं घरी लावणं शक्य आहे, पण यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. खाली वेलचीचे झाड घरी वाढवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत.
बाजारातून दर्जेदार वेलचीच्या बिया खरेदी करा. शक्य असल्यास थेट एखाद्या नर्सरीतून लहान रोप घ्या.
वेलचीसाठी सेंद्रिय खतयुक्त, ओलसर, आणि थोडी सावली असलेली जमीन योग्य असते. पाणी धरून ठेवणारी माती सर्वोत्तम ठरते.
बिया 24 तास पाण्यात भिजवा, नंतर सुमारे 1-2 सें.मी. खोल मातीमध्ये पेरा. कुंडीत लावत असाल तर खोल व चांगली निचरा होणारी कुंडी निवडा.
नियमित पाणी द्या, पण पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. माती नेहमी ओलसर राहील याची दक्षता घ्या.
वेलचीला थेट सूर्यप्रकाश नको, त्यामुळे अर्धसावलीत ठेवा. उष्ण आणि दमट हवामान वेलचीसाठी योग्य असते.
सेंद्रिय कंपोस्ट किंवा गोमूत्र खत वापरावे. 15-20 दिवसांनी खत टाकल्यास झाड अधिक जोमाने वाढते.