Sameer Panditrao
इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीला मोठा फटका बसल्यानंतर अमेरिका आता लष्करी कारवाईत ‘ग्रॅव्हिटी बॉम्ब’ वापरण्याची तयारी करत आहे.
अमेरिकन लष्कर ५००, १००० आणि २००० पाउंड वजनाचे ग्रॅव्हिटी बॉम्ब वापरणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री Pete Hegseth यांनी दिली.
याआधी Tomahawk Cruise Missile आणि ड्रोनच्या मदतीने हल्ले केले जात होते. मात्र आता युद्धनीतीत बदल होणार आहे.
हे इंजिन नसलेले ‘फ्री-फॉल’ शस्त्र आहे. विमानातून सोडल्यानंतर ते गुरुत्वाकर्षण आणि हवेच्या प्रतिकारावर आधारित लक्ष्याकडे जाते.
अमेरिकेने बॉम्बला Joint Direct Attack Munition (JDAM) किट जोडून जीपीएसद्वारे लक्ष्य अचूक भेदण्याची क्षमता दिली आहे.
२००० नंतर Iraq, Afghanistan आणि Syria मधील युद्धांमध्ये ग्रॅव्हिटी बॉम्बचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे.
मिसाइलपेक्षा हे बॉम्ब कमी खर्चिक असतात. मात्र त्यासाठी विमानाला लक्ष्याच्या जवळ जावे लागते आणि पूर्ण हवाई वर्चस्व आवश्यक असते.