Manish Jadhav
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेला गोरखगड हा ट्रेकर्सचा अत्यंत आवडता आणि थरारक किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची साधारण 2137 फूट असून हा किल्ला सह्याद्रीच्या रांगांमध्ये एका अजस्त्र सुळक्यासारखा दिसतो.
या किल्ल्याचे नाव प्रसिद्ध नवनाथ संप्रदायातील संत गोरक्षनाथ यांच्या नावावरुन पडले आहे. असे मानले जाते की, त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती.
गोरखगडचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या शिखराकडे जाणाऱ्या कातळात कोरलेल्या उभ्या पायऱ्या. या पायऱ्या चढताना ट्रेकर्सचा खरा कस लागतो, त्यामुळे हा एक थरारक अनुभव असतो.
गडाच्या माथ्यावरुन सिध्दगड, मच्छिंद्रगड आणि भीमाशंकर रांगांचे अतिशय विलोभनीय दृश्य दिसते. पावसाळ्यात इथून दिसणारी ढगांची दुलई आणि हिरवळ मनाला मोहून टाकते.
गडावर मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. या गुहांचा वापर पूर्वी साधू-संत राहण्यासाठी करत असत. आजही ट्रेकर्स रात्रीच्या मुक्कामासाठी या प्रशस्त गुहांचा वापर करतात.
गडावर कातळात खोदलेली अनेक पाण्याची टाकी आहेत. विशेष म्हणजे, उन्हाळ्यातही या टाक्यांमधील पाणी थंड आणि पिण्यायोग्य असते, जे गडाच्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे.
कल्याण किंवा ठाणे रेल्वे स्थानकावरुन बसने मुरबाडला जावे लागते. मुरबाडहून 'धसई' किंवा 'देहरी' या गावासाठी बस मिळते. देहरी हे गोरखगडच्या पायथ्याचे मुख्य गाव आहे.