Sameer Amunekar
गोरखगड हे नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे ठिकाण असून त्यावरूनच गडाचे नाव ‘गोरखगड’ पडले.
हा गड भिमाशंकर अभयारण्याच्या घनदाट जंगलात असून मच्छिंद्रगड, सिद्धगड आणि नाणेघाटाजवळील जीवधन या गडांच्या परिसरात वसलेला आहे.
या गडावर कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा इतिहास नाही. तो केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी व प्रवाशांच्या निवासासाठी वापरला जात असे.
गोरखगडावर एकूण १४ पाण्याची टाकी आहेत. त्यापैकी गुहेजवळील टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे.
गोरखगडाच्या सुळक्यात अतिविशाल गुहा असून तिच्या समोरच्या प्रांगणाखाली भयाण दरी, चाफ्याचे वृक्ष आणि समोर दिसणारा मच्छिंद्रगड अप्रतिम नजारा साकारतो.
गुहेसमोर उजवीकडील वाटेने पुढे जाऊन डावीकडे कातळात खोदलेल्या ५० पायर्यांच्या मदतीने गडाच्या माथ्यावर चढावे लागते. ही चढाई थोडी अवघड असून काळजीपूर्वक करावी लागते.
गडाच्या माथ्यावर महादेवाचे छोटेसे मंदिर आणि नंदी आहे. येथून संपूर्ण परिसराचा अद्भुत नजारा मच्छिंद्रगड, सिद्धगड, जीवधन व आहुपेघाट अनुभवता येतो.