Pranali Kodre
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने 12 डिसेंबर रोजी भारतीय संघाविरुद्ध गेकेबेरा येथे झालेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात भारताचा पराभव झाला असला, तरी कर्णधार सूर्यकुमार यादवने काही वैयक्तिक विक्रमांना गवसणी घातली आहे.
या सामन्यात सूर्यकुमारने 36 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने या खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट कारकिर्दीत 2000 धावांचा टप्पा पार केला.
सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 वी धाव 1164 वा चेंडू खेळताना पूर्ण केली.
त्यामुळे सूर्यकुमार सर्वात कमी चेंडूत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
याबाबतीत सूर्यकुमारने ऍरॉन फिंचला मागे टाकले आहे. फिंचने 1283 चेंडूत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2000 धावा केल्या होत्या.
सर्वात कमी चेंडूत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल आहे. मॅक्सवेलने 1304 चेंडूत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा केल्या होत्या.
या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर असून त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा करण्यासाठी 1398 चेंडू खेळले.
या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर भारताचा केएल राहुल असून त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा करण्यासाठी 1415 चेंडू खेळले.