Manish Jadhav
मानवी इतिहासात शिक्षा देण्यासाठी अनेक क्रूर आणि भयंकर पद्धतींचा वापर केला गेला आहे. आज (20 ऑगस्ट) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून अशाच काही शिक्षांबाबत जाणून घेणार आहोत.
‘हजार घावांमुळे होणारा मृत्यू...’ यालाच 'स्लो स्लाइसिंग' असेही म्हणतात, हा चीनमधील शिक्षेचा एक क्रूर प्रकार होता. आरोपीला खांबाला बांधून त्याच्या शरीराचे छोटे-छोटे भाग कापले जात. या छळाचा शेवट हृदयावर घाव घालून किंवा धड कापून केला जाई. ही पद्धत 1905 मध्ये बंद करण्यात आली.
समुद्रातील भयानक शिक्षा... 16व्या शतकात डच नौदलातील खलाशांना शिक्षा देण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात. दोषीला दोरीने बांधून जहाजाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पाण्याखाली ओढले जाई. अनेकदा यात खलाशाचा बुडून किंवा गंभीर जखमांनी मृत्यू होत असे.
या छळात उंदराचा वापर केला जाई. भुकेल्या किंवा आजारी उंदराला उलथ्या बादलीत आरोपीच्या उघड्या पोटावर ठेवले जाई. बादलीला बाहेरुन गरम केल्यावर उंदीर बाहेर पडण्यासाठी आरोपीच्या शरीराला कुरतडून आतमध्ये घुसून त्याच्या अवयवांना खात असे.
दूध आणि मधाचा वापर... ही पर्शियन लोकांची शिक्षा देण्याची अत्यंत वेदनादायक पद्धत होती. यात आरोपीला दोन होड्यांमध्ये ठेवले जाई. त्याला जबरदस्तीने दूध आणि मध खाऊ घातले जाई, ज्यामुळे त्याला जुलाब होत असत.
स्काफिझम पद्धतीत, दूध-मधाने माखलेल्या व्यक्तीला उन्हात ठेवले जाई. दुर्गंधी आणि गोडव्यामुळे माश्या, कीटक आकर्षित होऊन त्या व्यक्तीला चावत असत. यामुळे उष्माघात किंवा कीटकांच्या दंशामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होई.
ही शिक्षा आशियामध्ये सामान्य होती. यासाठी हत्तींना विशेष प्रशिक्षण दिले जाई. आरोपीला अत्यंत क्रूरपणे हत्तीच्या पायाखाली तुडवले जाईल. हत्तींना माणसांना त्वरित मारण्याचे किंवा हळूहळू छळ करण्याचे प्रशिक्षण दिले जाई.
हे सर्व छळ आणि शिक्षा मानवी क्रूरतेचे भयंकर उदाहरण आहेत. या शिक्षा बंद झाल्या असल्या तरी काही पद्धती आजही अस्तित्वात आहेत.
या पद्धतीच्या शिक्षा वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो. पण लक्षात ठेवा, या पद्धती इतिहासातील क्रूरतेचे दाखले आहेत. कृपया, अशा गोष्टींचा विचारही करु नका!