Manish Jadhav
न्यू ईयरचं सेलिब्रेशन करायचं असेल तर गोवा हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोव्यातील न्यू ईयर सेलिब्रेशनची पूरी दुनिया दिवाणी आहे.
गोव्याची राजधानी (पणजी) न्यू ईयरच्या सेलिब्रेशनसाठी सजली आहे. देश-विदेशातील पर्यटकांनी पणजी फुलून गेली आहे.
गोव्यातील पार्टी माहोल प्रत्येकाला खुणावतो. पर्यटकांची जान असणारा गोवा न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे. कॅसिनो, क्लब, हॉटेल्स पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
कळंगुट, बागा, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर 2024 वर्षाला अलविदा करण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावली आहे.
गोव्यातील समुद्रकिनारी 31 डिसेंबरच्या संध्येला पर्यटक सरत्या वर्षातील कटु अठवणी विसरुन नव्या वर्षासाठी संकल्पव्रत होतात.
गोव्यातील अनोखं न्यू ईयर सेलिब्रेशन अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्यासंख्येने दाखल झाले आहेत. गोव्यातील न्यू ईयरची धामधूम अनुभवनं पर्यटकांसाठी पर्वणी ठरतं.