Manish Jadhav
गोव्यात आज (18 एप्रिल) गुड फ्रायडेचा उत्साह पाहायला मिळाला. राजधानी पणजीसह विविध ठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी हा उत्सव साजरा केला.
गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मीयांचा एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा दिवस आहे. येशू ख्रिस्त यांना या दिवशी वधस्तंभावर खिळण्यात आले होते.
गोव्यातील ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये जावून येशूच्या नावाचे नामस्मरण करत प्रार्थना केली.
गोव्यात चर्चमध्ये येशूंच्या शेवटच्या क्षणांचा देखावा सादर करण्यात आला. येशूचा मृत्यू कसा झाला याची आठवण करुन देणारे धार्मिक कार्यक्रमही पार पाडले.
तसेच, गोव्यात चित्ररथ, धार्मिक मिरवणुकांचे देखील आयोजन करण्यात आले. येशूच्या शिकवणीप्रमाणे क्षमा, प्रेम आणि सेवा या मूल्यांचा मनोमन अंगीकार यावेळी ख्रिस्ती बांधवांनी केला.
याशिवाय, गोव्यात ख्रिस्ती बांधवांनी एकतेचा संदेश देत येशूने अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी लोकांना कसे जागरुक केले होते याविषयी सांगितले.