Sameer Panditrao
कोकणात अनेक सुंदर जागा आहेत.
किल्ले निवती आणि तिथला किनारा परिसर निसर्गरम्य आहेच.
पण आणखी एक खास जागा तिथे आहे.
तिथे समुद्रात एक गोल्डन रॉक पाहायला मिळतो.
किल्ले निवतीच्या पडझड झालेल्या परिसरात शेवटच्या टोकाला गेल्यावर खाली जायची पायवाट दिसते.
तिथून खाली समुद्राकडे गेल्यावर त्या गोल्डन रॉकपाशी जाता येते.
हे ठिकाण तुम्हाला परदेशापेक्षा सुद्धा भारी वाटेल.