1000 वाचवा! 'या' निळ्या फुलाने बनवा नाईट क्रीम; वृद्धत्व होईल कोसो दूर

Akshata Chhatre

सुरकुत्या

आजकाल जीवनशैलीतील बदलांमुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.

Gokarna flower benefits|homemade night cream | Dainik Gomantak

गोकर्ण

महागड्या रासायनिक उत्पादनांऐवजी, गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेली ही नैसर्गिक नाईट क्रीम त्वचेला जवां आणि चमकदार बनवते.

Gokarna flower benefits|homemade night cream | Dainik Gomantak

आवश्यक काय?

ही क्रीम रोज रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतात. गोकर्णाची फुले, मक्याचे पीठ, नारळ तेल, कोरफड जेल,व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे पदार्थ जमवा.

Gokarna flower benefits|homemade night cream | Dainik Gomantak

पद्धत

गोकर्णाची फुले तोडून त्यात गरम पाणी घाला. फुलांचा निळा रंग पूर्णपणे पाण्यात मिसळेपर्यंत तसेच ठेवा. एका वाटीत एक चमचा मक्याचे पीठ घ्या आणि त्यात गरजेनुसार निळे गोकर्ण पाणी मिसळा.

Gokarna flower benefits|homemade night cream | Dainik Gomantak

डबल बॉयलर पद्धत

हे मिश्रण गुठळ्या न होता एकसंध व्हावे यासाठी 'डबल बॉयलर' पद्धतीने शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात नारळ तेल, कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. तुमची नाईट क्रीम तयार आहे.

Gokarna flower benefits|homemade night cream | Dainik Gomantak

नाईट रुटीन

रात्री चेहरा चांगला स्वच्छ केल्यानंतरच ही क्रीम लावा.

Gokarna flower benefits|homemade night cream | Dainik Gomantak

टोनर

क्रीम बनवून शिल्लक राहिलेले गोकर्ण पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे पाणी तुम्ही सीरम म्हणून किंवा त्वचेला ताजेपणा देण्यासाठी टोनर म्हणून चेहऱ्यावर किंवा हातांवर शिंपडू शकता.

Gokarna flower benefits|homemade night cream | Dainik Gomantak

डिसेंबर-जानेवारीत लग्न? नवरीने आताच सुरु करायला हवं 'हे' रुटीन; लग्नपर्यंत चमकेल चेहरा

आणखीन बघा