Pramod Yadav
इडा पीडा दूर व्हावी आणि रोगराई नष्ट व्हावी यासाठी दरवर्षी दक्षिण गोव्यातील मळकर्णे येथे अनोखी होळी खेळली जाते.
शेणी उझो असे नाव असलेल्या या होळीच्या सणात पेटलेली शेणी म्हणजे शेणाची सुकी गोवरी अंगावर फेकली जाते.
सात दिवस व्रतस्थ राहणाऱ्या लोकांनाच या उत्सवात भाग घेता येतो.
मांडावर काही भाविक आंब्याचे ताळे घेऊन पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचतात.
माडीवर चढलेल्या गाड्यावर जेव्हा पेटती शेणी फेकली जाते, तेव्हा ती त्याच्यावर आपटून आगीच्या ठिणग्या सर्वत्र पसरतात.
खाली आंब्याचे ताळे घेऊन नाचणाऱ्यावरही या ठिणग्या पडतात.
देवाचाच हा प्रसाद समजून आपल्यावर झालेली ती कृपा समजतात.