Manish Jadhav
पावसाळ्यात गोव्याला मोठ्याप्रमाणात पर्यटक फिरायला येतात. पावसाळ्यात गोव्याचं निसर्ग सौंदर्य खुलंत.
पावसाळ्यात तुम्ही गोव्याला भेट दिली तरी येथील निसर्गाच्या प्रेमात पडाल. सर्वत्र निसर्ग सौंदर्यचा साज तुम्हाला पाहायला मिळतो.
गोव्याला तुम्ही जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की येथील गावांची सैर करा. तुम्हाला येथे निसर्गाचं अनोख दर्शन होईल.
गोव्याला प्रत्येकजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी येतो मात्र, पावसाळ्यात तुम्हाला येथील डोंगरदऱ्या, पाऊलवाटा, धबधबे तुमच्याशी बोलू लागतात असा भास होतो.
पावसाळ्यात तुम्हाला गोव्यात निसर्गानं हिरवाई पांघरली असा भास होतो.
पावसाळा अन् गोवा असं काही अनोखं समीकरणचं बनलं आहे. पावसाळ्यात गोव्याची दुनिया न्यारी होती. दूरची ती कातर रात्रही आपल्या मनाला साद घालते.
चिंब-चिंब पडणारा पाऊस गोव्यात तुम्हाला मनशांतीची अनुभुती करुन देतो. येथे निसर्गाशी तुमचं मन बोलू लागतं. कवीमनाचा राजा तुमच्या अंतरंगी साद घालू लागतो.