Pramod Yadav
गोव्यात दरवर्षी साजरा होणारा कार्निव्हल महोत्सव देश-विदेशात प्रसिद्ध आहे.
याच दरम्यान दीवाडी बेटावर मिनी कार्निव्हल म्हणून प्रसिद्ध असलेला पोतेकार उत्सव साजरा केला जातो.
पोर्तुगीजपूर्व काळापासून साजरा होणारा पोतेकार उत्सव त्यांच्या वेगळेपणासाठी संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे.
उत्सव काळात स्थानिक नागरिक वेगवेगळी वेशभूषा करतात याला स्थानिकांसह देश-विदेशातील पर्यटक भेट देतात.
दिवाडी बेटावर तीन दिवस हा मिनी कार्निव्हल साजरा होतो, यात स्थानिकांनी केलेल्या विविध वेशभूषा विचित्र प्रकारच्या असतात.
या उत्सव काळात दिवाडी बेटावर उत्साहाचे वातावरण असते. लहान मुले, युवक आणि युवतीही यामध्ये भाग घेतात.
पण, अलिकडे कालांतराने बदल होत गेला आणि आता तरुण मुले-मुली देखील यात सहभाग घेतात.