गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यामधील घरं नेहमीच आपल्या तजेलदार रंगांमुळे ओळखली जातात. पण या रंगीबेरंगी घरांमागचं खरं कारण काय?
गोव्याचा इतिहास पाहता, पोर्तुगीजांचा प्रभाव इथे खूप मोठा आहे.
त्यांनी गोव्यात आल्यानंतर चर्च आणि घरे बांधण्याची परंपरा आणली. सुरुवातीला चर्चना विशेष रंग दिले जायचे, त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसायचे.
कालांतराने हीच परंपरा इतर घरांमध्येही रुजली आणि मिसळून गेली.
गोव्यातील वातावरण आर्द्र असल्यानं, घरांना तजेलदार आणि टिकाऊ पेंट लावला जायचा.
पोर्तुगीज काळात पांढऱ्या रंगाने घरे रंगवायची नाही हा अलिखित नियम होता कारण फक्त चर्च आणि चॅपल आणि पांढऱ्या रंगाने रंगवले जात असे.
आज गोव्याच्या या रंगीबेरंगी घरांनी पर्यटनाला एक वेगळाच रंग आणला आहे. हे घरं गोव्याच्या संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतीक म्हणून उभं आहेत.