Akshata Chhatre
दिवसातील बराच काळ आपण कामाच्या ठिकाणी असतो, काम करतो. यामध्ये कळात-नकळतपणे आपल्यावर अनेक परिणाम होत असतात.
कामाच्या ताणामुळे माणसाला मानसिक त्रास तर होत असतोच मात्र वेळीच त्यावर उपाय न केल्याने तो शारीरिक त्रासांमध्ये सुद्धा बदलण्याची शक्यता असते.
आज आम्ही तुम्हाला बसल्या ठिकाणी कामाचा ताण कसा कमी करता येईल यावर एक सोपा उपाय सुचवणार आहोत.
अनेकवेळा कामाचा टास्क संपवण्याच्या नादात आपण एकाच जागेवर बसून असतो किंवा डॉक्टरांसारख्या कामांमध्ये तर कितीवेळ उभं राहावं लागतं.
अशात आपण श्वास घेणं विसरतो आणि हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आता तुम्हाला श्वास घेणं विसरतो हे वाचून प्रश्न नक्कीच पडला असेल.
असं म्हणतात दीर्घ श्वास घेतल्याने मनावरचा ताण कमी व्हायला मदत मिळते. अनेकदा आपण कामात एवढे गुंग होतो की नेमका कसा श्वास घेतोय हे देखील विसरून जातो.
दीर्घ श्वास घेतल्याने ब्लड प्रेशर कमी होतं आणि परिणामी एन्झायटी कमी व्हायला मदत मिळते. आता जर का कामाच्या ठिकाणी ताण येत असेल तर हा उपाय नक्कीच करून पहा.