गोमन्तक डिजिटल टीम
गोवा म्हणजे अनेकांसाठी एक टुरिस्ट डेस्टिनेशन. रोजच्या जीवनातून काहीसा आराम मिळवा म्हणून शोधलेलं ठिकाण.
गोवा म्हणजे काही लोकांसाठी पार्टी हब, मनसोक्त मौजमजा करण्याची जागा.
हे वाटण्यात काही गैर नाही कारण गोवा खरोखरच नेहमी पर्यटकांना आपलंस करत असतो, पर्यटन आणि गोवा यांचं कनेक्शन जबरदस्त आहेच.
मात्र गोवा हे काहीजणांसाठी त्यांचं घर आहे. एक मोठालं घर, समोर अंगण आणि आजूबाजूला शेती आणि बागायती. कधी प्रश्न पडलाय का गोव्यातली लोकं नेमकी कशी असतील? कशी राहत असतील, वावरत असतील?
सकाळी पोदेर आला म्हणजे इथे सकाळ होते.चहाचा मोठा घोट आणि सोबतची फाती याशिवाय यांची सकाळ पूर्ण होणारच नाही. इथे लोकं दुपारच्या जेवणात नाही तर सकाळच्या नाश्त्याला चपाती खातात.
दुपारी जेवल्यानंतर किमान ३ ते ५ इथे मस्त झोप काढली जाते. संध्याकाळी पुन्हा चहा झाला नाही तर दिवस पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही
महत्वाचं म्हणजे गोव्यात कधीही घराची दारं बंद दिसणार नाही. सोफ्याच्या कट्टयावर बसून हे लोकं तुम्हाला दिलखुलास गप्पा मात्र नक्कीच सांगतील आणि जाताना बरे सुशेगाद हां!! म्हणत आनंदाने निरोप देतील.