गोमन्तक डिजिटल टीम
गोवन घरे त्यांच्या स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. इथे विविध संस्कृतींचा प्रभाव आहे.
गोव्याची बहुतेक घरं पोर्तुगीज स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. रंगीत भिंती आणि विस्तृत खिडक्या ही तिथली खासियत आहे.
अनेक घरांसमोर सुंदर बागा आणि आंगण असतात, जिथे विविध झाडांची लागवड केलेली असते.
गोवन घरांच्या भिंती रंगीत असतात. गुलाबी, निळा, पिवळा असे रंग मुक्त़हस्ते वापरतात.
घरांच्या बांधकामात लाकडाचा वापर फार हुशारीने करण्यात येतो.
गोवा घरांची स्थापत्यकला साधी पण आखीवरेखीव असते त्यामुळे लोकांना त्याचे आकर्षण असते.
खूपशी घरं डोंगराच्या बाजूला किंवा समुद्र किनाऱ्यावर वसलेली आहेत. निसर्गाची सौंदर्यता आणि शांतता गोवन घरांना आणखी खास बनवते.