गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याचे पर्यटन फक्त समुद्रकिनारे, कसिनोज, प्रसिद्ध झालेली प्रार्थनास्थळे इथंपर्यंत मर्यादित नाही.
दुर्गम भाग, मंदिरे, चर्च, नद्या, जंगल, डोंगर दऱ्यांतील पायवाटा या अपरिचित गोव्याची ओळख पर्यटकांना करून देणे आवश्यक आहे.
जुना गोवा, बँड आणि उत्सव, मेजवानी, जत्रा, विवाहसोहळे, पार्टी, अंत्यविधी आणि जीवनशैली याची माहिती दिली पाहिजे.
गोव्यात काही ठिकाणी पसरलेल्या दगडांवर कातळशिल्पे पाहायला मिळतात त्याकडेही लक्ष दिले पाहिजे.
देवराई गोव्याचा अमूल्य खजिना आहे. पर्यटकांना निसर्गाचा हा आविष्कार दाखवला पाहिजे.
पोर्तुगीज येण्याआधीपासूनची देवळे, मशीद, चर्च, किल्ले, धालो, मांड, शिमगा हे लोकोत्सव, या गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत
सत्तरी, चोर्ला अशा ग्रामीण भागातील निसर्गसौंदर्य लोकांना आवर्जून दाखवले पाहिजे.
गोवा हे सांस्कृतिक समन्वयाचे अनोखे उदाहरण आहे. याच संस्कृतीचे आणि वैभवशाली वारशाचे दर्शन जगाला घडले पाहिजे.