गोमन्तक डिजिटल टीम
गणपती पूजन करण्याच्या गोव्यातील अनेक परंपरा पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ प्रचलित आहेत.
इथे केवळ मातीपासूनच नव्हे तर कागदावरती काढलेल्या गणपतीचे, लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तीचे, लाकडी मूर्तीचे तसेच पत्रीच्या गणपतीचेही पूजन केले जाते.
गोव्यातल्या गणपतीच्या मंदिरांत प्रतिष्ठापित, घाटमार्गावरती, जलमार्गावरती तसेच झरे तलावाच्या काठी आढळलेल्या मूर्तींतही वैविध्यपूर्ण शैलीचे दर्शन पाहायला मिळते.
पोर्तुगिजांमुळे गणपतीचे कागदावरती चित्र रेखाटू जाऊ लागले आणि ते लाकडी पेटीत बंद केले जायचे. ही परंपरा आजही सुरु आहे.
गोव्यात मूर्तींच्या कोरीव कामातही भिन्नता आढळून येते. इथल्या शिल्पकलेतले वेगळेपण अधोरेखित होते.
गोव्यातील जुनी कुटुंबे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या गणेशपूजनाच्या परंपरा अजूनही जपून आहेत.
इथल्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पैलूंचे विलोभनीय दर्शन आजही गोव्यातल्या ग्रामीण भागांत अनुभवायला मिळते, ते प्रसन्न करणारे आहे!