Manish Jadhav
गोव्याची निसर्ग किमया जेवढी भुरळ पाडते तेवढीच इथली संस्कृतीही कमालीची आहे.
गोव्याला भेट देणारा प्रत्येकजण इथल्या संस्कृतीच्या प्रेमात पडतो. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध जत्रेविषयी जाणून घेणारोत.
काल (20 ऑगस्ट) नार्वेतील मसण देवीची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली. आज (21 ऑगस्ट) आपण ‘गड्यांची जत्रे’बद्दल जाणून घेणारोत.
आख्यायिका अशी आहे की साधारण तेराव्या शतकात श्री वेताळाने पैंगीण गाव जिंकून घेतले व ते आपल्या इतर बारा राज्यांना जोडले. गावकऱ्यांनी त्याला गावात शांतपणे निवास करण्याची विनंती केली.
गावकऱ्यांनी या बदल्यात त्याला दर तीन वर्षांनी एका जत्रेचे आयोजन करण्याचे वचन दिले. तेव्हापासून पैंगीणमध्ये दर तीन वर्षांनी जत्रा भरवली जाते. जत्रेचे नाव आहे- ‘गड्यांची जत्रा’
काणकोण तालुक्यातील पैंगीण या गावात ही ‘गड्यांची जत्रा’ भरते आहे. पूजनीय आणि गावचे आधार दैवत असलेल्या वेताळ मंदिराभोवतीच्या मोकळ्या जागेत या जत्रेचे आयोजन होते. ही जत्रा दर तीन वर्षांनी एकदा भरते.