Sameer Panditrao
मागील काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी पडायला सुरवात झाली आहे. गोवा वेधशाळेने पुढील चार-पाच दिवस राज्यात बऱ्यापैकी थंडी राहणार असल्याचे वर्तविले आहे.
गेल्या २४ तासांत ३३.४ अंश सेल्सिअस कमाल आणि १९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात धुके आणि दव मोठ्या प्रमाणात पडत असल्याने गारवा वाढला आहे. नागरिक स्वेटर आणि उबदार कपड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिक सायंकाळी शेकोटी पेटवून ऊब घेत आहेत. तर पहाटे थंडी घालवण्यासाठी काहीजण कोवळ्या उन्हात थांबत आहेत.
थंडीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आणि आजारी व्यक्तींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्वचा कोरडी पडणे, ओठ व पाय फुटणे यांसारख्या समस्या वाढल्या आहेत.
नागरिकांनी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्यावे. बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन टाळावे. यामुळे आरोग्याला हानी पोहोचणार नाही.
थंडीचा सामना करण्यासाठी उबदार कपडे घालणे, गरम पदार्थांचे सेवन करणे, आणि योग्य आरोग्यदायी सवयी ठेवणे महत्त्वाचे आहे.