Goa Weather Update: गोव्याला पावसानं केलं हैराण; पडझडीच्या घटना सुरुच!

Manish Jadhav

गोव्यात पावसाचा कहर

गोव्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. राज्यात मोठ्याप्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.

goa | Dainik Gomantak

पेन्हा दी फ्रँका येथे पडक्या घराची भिंत कोसळली!

भंडार वाडा, प्रभाग क्र 1, पेन्हा दी फ्रँका येथील रघुनाथ रातबोले यांच्या मालकीच्या पडक्या घराची भिंत कोसळली. पर्वरी अग्निशमन दल आणि पोलिसांनी पेन्हा दी फ्रँकाच्या तलाठ्यांसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

accident | Dainik Gomantak

डिचोलीत अडकलेल्या महिलेची पाच तासांनी सुटका

डिचोलीत कार अडकलेल्या महिलेची तब्बल पाच तासांनी सुटका करण्यात आली. अग्निशामन दल, पोलिस आणि स्थानिकांच्या प्रयत्नांमुळ मध्यरात्री दीड वाजता महिलेची सुटका केली.

car accident | Dainik Gomantak

डिचोलीत शिशुवाटीकेला लागून असलेली भिंत पडली

मुसळधार पावसामुळे डिचोली येथील श्री शांतादुर्गा शिशुवाटिकेला लागून असलेली भिंत कोसळली. शाळेला सुट्टी दिल्याने अनर्थ टळला.

bicholim | Dainik Gomantak

शिगाव काऱ्यामळ येथे घरावर झाड कोसळले

वादळी वाऱ्याच्या तडाख्याने शिगाव काऱ्यामळ येथील सुकुर फर्नांडिस यांच्या घरावर अंब्याचे झाड कोसळले, ज्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

goa | Dainik Gomantak

रत्नागिरीजवळ दरड कोसळली, पाच रेल्वे रद्द

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीजवळ दरड कोसळली. ट्रॅकवरील माती आणि चिखल दूर करण्यासाठी अडचण निर्माण झाली. पाच रेल्वे रद्द करण्यात आल्या.

Railway track

शिगावात दुर्घटना!

मोटोज येथे टाटा सुमो आणि अग्निशामन दलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात फादर थॉमस ( कुळे, पिलार) जखमी झाले. शिगाव येथे घरावर कोसळलेले झाड काढण्यासाठी अग्निशामन दल जात असताना ही घटना घडली.

accident | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी