Manish Jadhav
गोव्यात लोक खासकरुन मोठ्याप्रमाणात पावसाळ्यात फिरायला येतात. गोव्याला तुम्ही पावसाळ्यात भेट देत असाल तर येथील पोर्तुगिजकालीन किल्ले नक्की पाहा.
आग्वाद किल्ला हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे.
1609 मध्ये हा किल्ला बांधण्यास सुरुवात झाली. पाच वर्षे बांधकाम सुरु राहून1612 मध्ये हा किल्ला पूर्ण झाला.
गोव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्वाद किल्ल्याचा जन्म झाला. या किल्ल्यावरुन चारही बाजूला नजर ठेवता येते.
आग्वाद हा किल्ला पोर्तुगीज वास्तुकलेचा उत्तम जतन केलेला नमुना आहे.
पोर्तुगीजांनी 17 व्या शतकाच्या सुरुवातीला डच आणि मराठ्यांच्या आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी हा किल्ला बांधला होता.
किल्ल्याला भक्कम भिंती, बुरुज आणि खंदक आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या परिसरात गोड्या पाण्याचा मोठा साठा आहे, ज्याला अगोंदा टाकी म्हणून ओळखले जाते.