Curtorim: तळ्यांनी नटलेले निसर्गरम्य 'कुडतरी'

गोमन्तक डिजिटल टीम

धान्याचे कोठार 'कुडतरी'

कुडतरी सालसेट अर्थात सासष्टी तालुक्यात येते. या हिरव्यागार गावाला 'सालसेटचे धान्याचे कोठार' म्हणून ओळखले जाते. या गावाला कुडतरी नाव पडले कारण येथे धान्य साठवण्यासाठी नदीच्या काठावर कुड्ड (खोल्या) बांधल्या गेल्या होत्या.

Goa Curtorim

जैवविविधता वारसा स्थळ

कुडतरी हे गोव्यातील दुसरे जैवविविधता वारसा स्थळ आहे. भातशेती, नारळाची झाडे, विविध तलाव- पाणवठे, नयनरम्य टेकड्या आणि सीमेजवळून वाहणारी झुआरी नदी कुडतरीला समृद्ध बनवते.

Goa Curtorim

तलावांचे गाव

कुडतरी परिसरात अनेक छोटेमोठे तलाव आहेत. पाच मोठे तलाव आणि जवळपास सोळा पाणवठ्यांनी या गावाचे सौंदर्य आणखीनच अधोरेखित होते. या तलावांवरती स्थलांतरीत पक्षी पाहावयास मिळतात.

Goa Curtorim

माई तलाव

माई टोलेम अर्थात माई तलाव हा इथला एक मोठा तलाव आहे. इथे मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होतो. गोड्या पाण्यातील मासे घेण्यासाठी इथे गर्दी होते.

Goa Curtorim

रायटोलेम तलाव

राय टोलेम हे आता प्रसिद्ध पर्यटन स्थळ झालेले आहे. तो गोव्यातील सर्वात सुप्रसिद्ध तलावांपैकी एक आहे. या प्रकल्पाचे सुशोभीकरण झाल्यामुळे परिसराचे सौंदर्यात आणखीनच भर पडलेली आहे.

Goa Curtorim

इतर ठिकाणे

आंगडी टोलेम, सोनबेम टोलेम, गुड टोलेम, कोलंब टोलेम हे इतर तलावही प्रेक्षणीय आहेत. श्री रवळनाथाचे मंदिर इथे पाहता येते. तळ्याच्या काठी असलेली सेंट ॲलेक्स चर्च ही जुनी चर्च पर्यटकांना आकर्षित करते.

Goa Curtorim

कसे जाल

हे शहर दक्षिण गोव्यात येते. सासष्टी तालुक्यातील या गावाला तुम्ही खाजगी वाहनाने जाऊ शकता. मडगाव शहरापासून सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करून तुम्हाला सहज इथे जाता येते.

Goa Curtorim

गोव्यातील १७ व्या शतकातील 'ही' भव्य वस्तू तुम्ही पाहिली आहे का?

Braganza House
आणखी पाहा