Manish Jadhav
गोव्याचं मोहीनी घालणारं निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या दिलाशी रेशमी बंध निर्माण करतं.
गोव्याच्या निसर्गाचं लालित्य पर्यटकांना सुखावून जातं. इथे येणाऱ्या पर्यटकाला पार्टी माहोलापेक्षा निसर्गाचा माहोल हवाहवासा वाटतो.
गोव्याची निसर्ग कांती पर्यटकांना स्वर्गाहुनी प्रिय वाटते. तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये कुडतरी गावाची सफर नक्की केली पाहिजे.
गोवा प्लॅनमध्ये तुम्ही अभयारण्ये पाहण्याचं बिलकुल विसरु नका. यामध्ये मग म्हादई अभयारण्य, बोंडला अभयारण्यांना नक्की भेट दिली पाहिजे.
अभयारण्याच्या सफरीमध्ये तुम्हाला पशुपक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतात. त्यातही तुम्हाला पक्षी निरीक्षणाचा छंद असेल तर तुम्ही सलीम अली अभयारण्याला नक्की भेट दिली पाहिजे.
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचं गोवा खुल्या अंतकरणाने स्वागत करतो. पर्यटनप्रेमी गोवा प्रत्येकाला भुरळ पाडतो.