Manish Jadhav
गोवा म्हटलं की, पर्यटकांच्या कल्पनेत रेखाटलेलं एक विलोभनीय चित्र डोळ्यांसमोरुन तरळून जातं.
देशातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी गोवा एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येतात.
एकदा गोव्याला भेट देणारा पर्यटक पुन्हा-पुन्हा भेट देवू इच्छितो. इथे आल्यानंतर एक प्रसन्नतेचा भाव पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो.
गोव्याचं विलोभनीय निसर्ग सौंदर्य मनाला मोहिनी घालतं. तसेच, गोव्याचं सतवर रुप पर्यटकांना आकर्षितही करतं.
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. या महिन्यात (नोव्हेंबर) पर्यटकांची गोव्यात तोबा गर्दी पाहायला मिळते.
तुम्ही या महिन्यात (नोव्हेंबर) गोवा ट्रीप प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी पर्वणी ठरेल. इथली मोहीनी घालणारी पर्यटन स्थळे नक्की पाहिली पाहिजे. ज्यामध्ये इथले गड किल्ले, बॅसिलिका चर्च, मंदिरे इत्यादी...