Manish Jadhav
गोव्याला लाभलेली निसर्ग किमया पर्यटकांना साद घालते. पर्यटकांचं खट्याळ मनही त्याच्या प्रेमात पडतं.
गोव्यातील शांत समुद्रकिनारे पर्यटकांना सुखाची शांती देवून जातात. मनाला भावणारी इथली शांतता मनाला प्रसन्नता देवून जाते.
गोव्याला येणारा पर्यटक जलक्रिडांचा नक्की आनंद लुटतो. राफ्टिंग, स्कूबा डायव्हिंग यांसारख्या जलक्रिडांचा नक्की आनंद लुटला पाहिजे.
पश्चिम घाटाच्या राजीत वसलेल्या गोव्याच्या प्रेमात पडणारा पर्यटक कविता करु लागतो. पर्यटकांचं कवी मन इथल्या निसर्गाला साद घालू लागतं.
गोव्याला एकदा भेट देणाऱ्या पर्यटकाची गोव्याशी एक 'दिल्लगी' लागते. इथला माहोल पर्यटकांना साद घालतो.