Manish Jadhav
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात तुम्ही गोवा ट्रीप प्लॅन करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी पर्वणी ठरेल. नोव्हेंबर महिना गोव्यात फेस्टिव्हल महिना म्हणून ओळखला जातो.
गोव्यातून पर्यटक सुखावून जातो. गोव्याचा दंग माहोल पर्यकांना भुरळ पाडतो. पर्यटकांचं मन 'गोवा मेरी जान' म्हणतं.
गोव्यातील नितळ, सुंदर आणि भुरळ पाडणारे समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावतात. इथली शांतता पर्यकांना परमोच्च सुखाची प्राप्ती करुन देते.
विविधतेने नटलेल्या गोव्याची संमिश्र संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते. इथले सण-उत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात.
गोव्याचा पार्टी माहोल पर्यटकांना साद घालतो.