Manish Jadhav
हिवाळ्यात तुम्ही ट्रीप प्लॅन करत असाल देशातील या राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या. यातही तुम्ही प्राणी-पक्षीप्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही राष्ट्रीय उद्याने पर्वणीच ठरतील.
हिवाळ्यात तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर उत्तराखंड राज्यातील जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यान नक्की पाहा. हे राष्ट्रीय उद्यान वाघासाठी प्रसिद्ध आहे.
राजस्थानातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करतं. रणथंबोरही वाघांसाठी प्रसिद्ध आहे. वाईल्ड-लाईफ सफरीसाठी हे उद्यान बेस्ट आहे.
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोने काझीरंगाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलाय. हिवाळ्यात तुम्ही काझीरंगाला नक्की भेट द्या.
मध्यप्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे. देशातील सर्वाधिक वाघ या राष्ट्रीय उद्यानात आढळतात. याशिवाय, विविध पक्ष्याचं वस्तीस्थान म्हणून हे राष्ट्रीय उद्यान ओळखले जाते.
राज्यस्थानातील केवलदेव राष्ट्रीय उद्यान पक्षीनिरिक्षकांसाठी नंदनवन म्हणून ओळखले जाते. काझीरंगा प्रमाणेच केवलदेवलाही युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला आहे.