Manish Jadhav
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. गोव्याची विलोभनीय निसर्ग काया पाहण्यासाठी पर्यटक मोठ्यासंख्येने दरवर्षी येतात.
आज (28 नोव्हेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून अशा समुद्रकिनाऱ्याशी जाणून घेणार आहोत, जो पर्यटकांना खुणावतो.
कमी गर्दी असणारा कांदोळी समुद्रकिनारा पर्यटकांना साद घालतो. हा समुद्रकिनारा शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
जर तुम्ही पार्टी करुन कंटाळला असाल आणि आता वाहत्या पाण्याजवळ वाळूवर झोपून सूर्याच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल कांदोळी समुद्रकिनारा बेस्ट आहे.
कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला प्रसन्नतेचा भाव जाणवेल. अथांग असा समुद्रकिनारा तुमच्याशी बोलतोय असा भास होतो.
पर्यटकांचं हळवं मन कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर भाव प्रकट करु लागतं.