Manish Jadhav
गोव्याला समृद्ध अशी निसर्ग संपदा लाभली आहे. निसर्ग हा गोव्याचा ठेवा आहे.
गोवा हे पर्यटन प्रेमी राज्य आहे. मोठ्याप्रमाणावर पर्यटक दरवर्षी गोव्याला भेट देतात.
गोव्याचे जेष्ठ पत्रकार धर्मानंद कामत यांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या केंद्रीय माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी परखड भाष्य केले.
निसर्ग हा गोव्याचा ठेवा आहे. इथल्या स्थानिकांची शेती, बागायती, मासेमारी आणि पर्यटन हे चार मुख्य व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहेत. पुढच्या पिढीसाठी गोवा जिवंत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रभू कार्यक्रमानिमित्त बोलताना म्हणाले.
गोवा हा गोमंतकीयांचा आहे, परंतु गोमंतकीयच गोव्यात कमी दिसतात, अशी खंतही कार्यक्रमात प्रभू यांनी बोलून दाखवली.
प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती टिकवण्याचे मोठे आव्हान देशासमोर आहे. त्याचप्रमाणे गोव्याचे गोवेपण टिकवण्याचे आव्हान देखील गोमंतकीयांसमोर आहे. ते टिकवण्यासाठी काम करायला हवे, असेही प्रभू पुढे म्हणाले.