Manish Jadhav
गोव्याचं लुभावणारं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहीनी घालतं. जीवाचा गोवा करण्यासाठी पर्यटक येतात.
गोव्यावर निसर्गाची झालेली किमया पर्यटकांच्या अंतकरणात घर करते. एकदा तरी गोव्याला जावून आलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं.
गोव्याची संस्कृती, ग्रामीण जीवन, उत्सव पर्यटकांना अलंकृत करतात. आज आपण उत्तर गोव्यातील एका गावाबाबत जाणून घेणारोत.
गोव्याला भेट देणारा पर्यटक सर्सासपणे उत्तर गोव्यातील बीचेस पाहण्यासाठी उत्सुक असतो. पण तुम्ही उत्तर गोव्यातील या गावाला देखील भेट दिली पाहिजे.
साळीगाव प्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या 3 किमी. अंतरावर आहे. साळीगावला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे.
साळीगावात तुम्ही गोव्यातील नावाजलेली प्रसिद्ध चर्च, मंदिरे पाहायला मिळतात. ज्यामध्ये मग माई दे ड्यूस पॅरिश चर्च, सेंट ॲन चॅपल, अवर लेडी ऑफ रोझरी चॅपल, सेंट कॅजेटन चॅपल, भगवान दत्त मंदिर, शर्वणी मंदिर, इत्यादी...
गोव्यातील टुमदार घरे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण राहिली आहेत. साळीगावात तुम्हाला गोव्यातील पारंपारिक घरे पाहायला मिळतात.
तुम्ही गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर उत्तर गोव्यातील या गावाला नक्की भेट द्या. इथे जाणून घेणाऱ्यांसाठी, भटकंती करणाऱ्यांसाठी खूप गोष्टी आहेत.