Manish Jadhav
पाळोळे बीच हा त्याच्या नैसर्गिक 'अर्धवर्तुळाकार' किंवा चंद्रकोरीसारख्या आकारामुळे प्रसिद्ध आहे. दोन्ही बाजूंनी उंच खडकांनी वेढलेला हा किनारा अतिशय नयनरम्य दिसतो.
उत्तर गोव्याच्या तुलनेत येथील समुद्र खूप शांत आहे. पाण्याची खोली कमी असल्यामुळे येथे पोहणे अधिक सुरक्षित मानले जाते. त्यामुळे कुटुंबियांसोबत सुट्ट्या घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
पाळोळेमध्ये एक अनोखी संकल्पना राबवली जाते, ती म्हणजे 'सायलेंट डिस्को'. येथे हेडफोन्स लावून गाणी ऐकत डान्स केला जातो, जेणेकरून किनाऱ्यावरील शांतता भंग होत नाही.
येथील शांत पाण्यात कायाकिंग करणे हा पर्यटकांचा आवडता छंद आहे. पहाटे किंवा सूर्यास्ताच्या वेळी समुद्रात कायाकिंग करतानाचा अनुभव अविस्मरणीय असतो.
पाळोळे समुद्रनिकाऱ्यावरुन अनेक बोटी पर्यटकांना डॉल्फिन दाखवण्यासाठी समुद्रात घेऊन जातात. नशिबाने साथ दिल्यास येथे समुद्रात उड्या मारणारे डॉल्फिन पाहायला मिळतात.
पाळोळेपासून जवळच 'बटरफ्लाय बीच' आणि 'हनिमून आयलंड' ही लपलेली ठिकाणे आहेत. येथे बोटीने जाता येते, जिथे तुम्हाला पूर्णतः शांतता आणि निसर्गाचे सानिध्य मिळते.
पाळोळेची ओळख म्हणजे येथील रंगीबेरंगी 'बीच हट्स'. पर्यटकांना समुद्राच्या लाटांच्या आवाजात राहण्यासाठी हे बांबूचे कुटीर (Huts) पर्यटकांना भुरळ घालतात.
येथील सूर्यास्ताचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. संध्याकाळी किनाऱ्यावरील शॅक्समध्ये (Shacks) बसून ताजे गोवन सी-फूड आणि संगीताचा आनंद लुटता येतो.