Goa Tourism: 'तू दूर का असा तू दूर का?' पर्यटकांच्या मनाची गोव्याला साद

Manish Jadhav

गोवा

गोव्याच्या निसर्ग सौंदर्याची कांती पर्यटकांना साद घालते. दरवर्षी मोठ्याप्रमाणात पर्यटक गोव्याला भेट देतात.

Goa Tourism | Dainik Gomantak

पर्यटन हंगाम

गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात पर्यटक मोठी गर्दी करतात. तुम्हीही गोव्याचा प्लॅन करत असला तर हा महिना तुमच्यासाठी खास ठरेल.

Goa Tourism | Dainik Gomantak

कलंदर मनाला गोव्याचे वेध

गोव्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या कलंदर मनाच्या तारा छेडतं. मनाला प्रफुल्लित करणारी निसर्ग सौंदर्याची किमया पर्यटकांना आकर्षित करते.

Goa Tourism | Dainik Gomantak

फेस्टिव्हल महिना

नोव्हेंबर महिना गोव्यात फेस्टिव्हल महिना म्हणून ओळखला जातो. तुम्ही सिनेरसिक असाल तर या महिन्यात गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची धूम नक्की अनुभवा.

IFFI 2024 | Dainik Gomantak

गोवन संस्कृती

गोव्यातील फेस्टिव्हल तुम्हाला गोवन संस्कृतीचं दर्शन घडवतात. निसर्ग सौंदर्याची किमया साधलेल्या गोव्यानं आपली संस्कृतीही जपली आहे.

Goan culture | Dainik Gomantak

शांत दुनिया

गोव्यातील शांत समुद्रकिनारे पर्यटकांना मनमोहित करतात. 'तू दूर का असा तू दूर का?....' हे मराठीतील प्रसिद्ध गाणं गुणगुणत पर्यटक आपली संध्या यादगार बनवतात. तसेच, गोव्याला सादही घालतात.

Goa Beach | Dainik Gomantak
Goa Tourism | Dainik Gomantak
आणखी बघा