Manish Jadhav
गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्यासंख्येने हजेरी लावत आहे.
गोव्याचं लुभावणारं निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या हळव्या मनाला साद घालतं. तुम्हीही गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर तुम्ही या महिन्यात नक्की भेट दिली पाहिजे
गोव्याचं नितळ निसर्ग सौंदर्य पर्यटकांना साद घालतं. पश्चिम घाटाच्या निसर्गराजीत वसलेला टुमदार गोवा पर्यटकांना आकर्षित करतो.
फेस्टिव्हल आणि गोवा हे समीकरण बनलं आहे. पर्यटक खासकरुन गोव्यातील फेस्टिव्हल पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात.
गोव्याचा दिलदारपणा पर्यटकांना मोहीनी घालतो. इथली जीवाला-जीव देणारी माणसं पर्यटकांशी जिव्हाळ्याचं बंध बांधून जातात.
गोव्याला एकदा भेट देणाऱ्या पर्यटकाला पुन्हा-पुन्हा यावसं वाटतं. मन प्रसन्न करणारे इथले शांत समुद्रकिनारे पर्यटकांना संजीवनी सारखे भासतात.