Manish Jadhav
गोवा म्हटलं की, निसर्गाच्या खोबणीत वसलेलं छोटंश राज्य आठवतं. गोवा पर्यटकांना सदैव हाक देतो.
आज (15 नोव्हेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून पर्यटकांना यादगार बनवणाऱ्या संध्या (संध्याकाळ) बद्दल जाणून घेणारोत.
गोव्यातील पार्टी माहोल पर्यटकांना आकर्षित करतो. क्लब, क्रूझ पार्टी, कॅसिनो हे पर्यटकांचे आकर्षण आहेत. गोव्याला भेट देणारा पर्यटक या ठिकाणांना जरुर भेट देतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक वेळात-वेळ काढून गोव्याला भेट देतात. इथे आल्यानंतर पर्यटकांना सूखून मिळतो.
पर्यटक खासकरुन गोव्यातील संध्या समुद्रकिनारी अनुभवतात. समुद्रकिनारी पर्यटकांचं बावरं मनं कविता करु लागतं.
गोव्यातील संध्याकाळ पर्यटकांना शांतीची अनुभूती देवून जाते. पर्यटकांच्या दिलाच्या ताराही इथे छेडल्या जातात.