Manish Jadhav
गोव्याच्या निसर्ग सौंदर्यासह इथले समुद्रकिनारे मोहिनी घालतात.
गोव्यात अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत, जे तुमची ट्रिप रंगीन बनवतात.
गोव्याचा अल्हाददायक पाऊस मनावर अधिराज्य गाजवतो. मन कविता करु लागतं.
गोव्याची नाईटलाइफ पाहून इथे येणारा पर्यटक गोव्याच्या प्रेमात पडतो. इथे तुम्ही क्रूझ पार्टी, क्लब, बार, रेस्टारंट, बीचेसला भेटू देऊ शकता.
गोव्यातील सुशेगातपणा मनाला मोहवून टाकतो. इथली शांतता अनुभवण्यासाठी पर्यटक येतात.
गोवा हे बॉलिवूड सेलिब्रेटीसह प्रसिद्ध उद्योगपतींचं दुसरं घर बनलयं. इथे अनेक प्रसिद्ध कलाकारांची घरं आहेत. ज्यामध्ये अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, क्रिकेटर युवराज सिंग इत्यादी...
गोव्यात अनेक प्रसिद्ध अभयारण्ये पाहायला मिळतात. ज्यामध्ये मग पक्षीप्रेमींसाठी सलिम अली पक्षी अभयारण्य, बोंडला अभयारण्य, म्हादई अभयारण्य, कोटीगाव अभयारण्य इत्यादी. गोव्याला खासकरुन तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यात भेट दिली पाहिजे.
गोव्यातील पोर्तुगीजकालीन किल्ले ऐतिहासिक घटनांची साक्ष देतात. गोव्यातील किल्ले प्रेक्षणीय ठिकाणे बनली आहेत. अग्वाद किल्ला, शापारो किल्ला, मुरगावचा किल्ला इत्यादी इतिहासातील आठवणींना उजाळा देतात.