Manish Jadhav
गोव्याला बहुमूल्य असा मंदिरांचा वारसा लाभला आहे. गोव्यातील प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात.
गोव्यातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांशिवाय प्राचीन मंदिरांचा ऐतिहासिक वारसा पर्यटकांना समृद्ध करतो. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून प्रसिद्ध भगवान नागेश मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत...
पणजीपासून साधारण 25 कि.मी. अंतरावर बांदोडा गावात भगवान नागेशाचे मंदिर आहे.
या मंदिराजवळ एक 1,413 पूर्वीचा शीलालेख आहे, ज्यावर स्थानिक कुटुंबाकडून भोवतालची जागा देणगी दाखल दिल्याचे म्हटले आहे.
विजय नगरचा राजा वीर प्रताप देवराय याच्या राजवटीत ही देणगी दिल्याचे सांगितले जाते.
मंदिरात नागेश शिवलिंगासह शिव-पार्वती आणि गणेशाची मूर्ती आहे. हे मंदिर सुमारे सातव्या किंवा आठव्या शतकातील आहे.
मंदिराच्या आजच्या वास्तूचा जीर्णोद्धार 1880 मध्ये करण्यात आला होता. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.