Goa River: गोव्यातील नद्यांचं जादुई सौंदर्य, शांतता आणि सौंदर्याच्या मिलाफाला एकदा तरी भेट द्या!

Manish Jadhav

गोवा

पश्चिम घाटात वसलेला टुमदार गोवा पर्यटकांना आकर्षित करतो. मनाला भावणारं इथलं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला खुणावतं.

Goa Tourism | Dainik Gomantak

गोव्यातील नद्या

तुम्ही गोव्यात आल्यानंतर इथल्या प्रसिद्ध सुमुद्रकिनाऱ्यांची सैर नक्की केली असेलच ना... पण आज (25 फेब्रुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध अशा दोन नद्यांविषयी जाणून घेणार आहोत.

Mandovi River | Dainik Gomantak

मांडवी आणि जुवारी नदी

गोव्याच्या भूमीला सुजलाम, सुफलाम करणाऱ्या दोन महत्त्वाच्या नद्या म्हणजे मांडवी आणि जुवारी या असून, मांडवी ही गोव्याची मोठी नदी तर जुवारी ही लांब नदी आहे.

Mandovi River | Dainik Gomantak

पश्चिमवाहिनी नदी

पश्‍चिमवाहिनी असणारी जुवारी नदी सह्याद्रीच्या पर्वतरांगात उगम पावल्यानंतर दगडधोंड्यातून मार्ग काढत शेवटी मुरगाव शहराच्या आसपास अरबी सागराला मिळते.

Juwari river | Dainik Gomantak

जुवारीचा विस्तार

जुवारी नदीच्या खोऱ्याचा विस्तार राज्याच्या 973 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात झालेला आहे. सह्याद्री पर्वतरांगातून वहात येणाऱ्या या नदीच्या खोऱ्यात 31.4 टक्के वनक्षेत्र आहे.

Juwari river | Dainik Gomantak

इतिहास

आज मांडवी आणि जुवारी या दोन्ही नद्या, स्वतंत्र म्हणून ओळखल्या जात असल्या तरी पृथ्वीतलारवती जेव्हा शेवटच्‍या हिमयुगाचा कालखंड चालू होता, तेव्हा 20 हजार वर्षांपूर्वी मांडवी आणि जुवारी या नद्या खडकाळ प्रदेशातून एकल नदीप्रणाली म्हणून वाहत होत्या.

Juwari river | Dainik Gomantak

निसर्गाचं सानिध्य

मांडवी आणि जुवारी या दोन्ही नद्यांना निसर्गाचं वरदान लाभलं आहे. पर्यटकांना भावणारा निसर्ग नजारा आणि मांडवी आणि जुवारी नद्याचं विशाल पात्र पर्यटकांना मोहवून टाकतं.

Juwari river | Dainik Gomantak
आणखी बघा