Manish Jadhav
गोव्याचं मनाला भुरळ पाडणारं निसर्ग सौंदर्य पुन्हा-पुन्हा पाहावसं वाटतं. व्यस्त कामातून सुट्टी मिळाली लोक गोव्याची वाट धरतात.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गोवा अनेक अर्थांनी खास आहे. गोव्याची संस्कृती, नाईटलाईफ, अभयारण्ये, किल्ले, गोवन फूड, क्लब इत्यादी... मनाला भावतात. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून याबद्दल जाणून घेणारोत.
गोव्यात येणारा प्रत्येकजण पहिल्यांदा येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे पाहतो. खासकरुन उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
गोव्यात अनेक प्रसिद्ध अभयारण्ये आहेत, ज्यामध्ये म्हादई अभयारण्य, बोंडला अभयारण्य, सलिम अली पक्षी अभयारण्य, काटेगाव अभयारण्य येतात. पर्यटक गोव्यातील ही अभयारण्ये पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात.
गडबड आइस्क्रीम, फ्रँकी, रस ऑम्लेट पाव, फिश थाळी, मिसळ पाव, कोळंबीचे सार इत्यादी गोवन फूड तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजे. वरील गोवन फूड खाल्ल्याशिवाय तुम्ही गोवा सोडला नाही पाहिजे.
तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये येथील गडकिल्ल्यांची सैर नक्की केली पाहिजे. येथील गडकिल्ले मोहिनी घालतात. गोव्यात आल्यानंतर येथील अग्वाद, शापोरा, मुरगाव, तेरेखोल, अंजदिव, चोपारा इत्यादी किल्ले पाहिलेच पाहिजे.
पावसाळ्यात गोव्याचं निसर्ग सौंदर्य खुलंत. गोव्यातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. ज्यामध्ये मग दूधसागर, हरवळे, सदा, तांबडी सुर्ला, नेत्रावली, केसरवल धबधबे मोहिनी घालतात.
गोव्याची नाईटलाईफचा आनंद तुम्ही नक्की लुटला पाहिजे. इथे तुम्ही क्रूझ पार्टी, कसिनो, क्लब्स इत्यादी ठिकाणी भेट देऊन एन्जॉय करु शकता.
गोवन संस्कृती अद्भूत आहे. पावसाळा सुरु झाला की, गोव्यातील उत्सवांना सुरुवात होते. ज्यामध्ये साओ जाओ, चिखल कालो, बोंदरेम, कार्निव्हल, इत्याही उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
गोव्यातील प्राचीन मंदिरे पाहण्यासाठीही पर्यटक मोठी गर्दी करतात. तुम्हीही तुमच्या ट्रीपमध्ये येथील मंदिरे नक्की पाहा.